Sakaal Newspaper : मुलांच्या विकासाला मदत करणारे ‘टॉय ट्रंक’

Sakaal Newspaper : मुलांच्या विकासाला मदत करणारे ‘टॉय ट्रंक’

मुलांच्या विकासाला मदत करणारे ‘टॉय ट्रंक’
पारंपारिक खेळणीचे उत्पादक ‘टॉय ट्रंक’
मुलांच्या बौध्दिक विकासाला साह्यक ‘टॉय ट्रंक’

पुणे, ता. १६ : गेल्या काही वर्षात मुलांच्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स अविभाज्य भाग बनले आहेत. किंबहुना ते दैनंदिन आयुष्यात नितांत गरजेचे ठरत आहे. मात्र लॅपटॉप, मोबाईल या गॅझेट्सचा स्मरण शक्तीवर परिणाम होतो. असे असतानाही युवक-युवकांबरोबरच, लहान मुलांच्या आयुष्यात देखिल गॅजेट्सचे महत्त्व वाढतच चालले आहे. कोरोना काळापासून मुलांच्या शाळा, क्लासेस यांचे स्वरूप ऑनलाइन झाले. याचाच परिणाम म्हणून वह्या पुस्तकांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली.

ऑनलाइन गेम्स इत्यादीमुळे मुलांचे आउटडोअर गेम्स खेळणे कमी झाले आहे. असे चित्र सध्या सर्वत्र दिसते. त्यामुळे प्रत्येक पालकाला सध्या पडत असलेला प्रश्‍न म्हणजे आपल्या पाल्याला स्क्रीनपासून कसे दूर ठेवता येईल. याचे एक अनोखे आणि भन्नाट उत्तर एका स्टार्टअपने शोधले आहे. टॉय ट्रंक (toytrunk) असे या स्टार्टअपचे नाव आहे. पुण्यातील एका आरकिटेक (म्हणजे काय) आई प्रियांका... आणि डिझाइनर अजय... या दोघांनी हे स्टार्टअप सुरू केले आहे.

काय आहे टॉय ट्रंक :
टॉय ट्रंक हे एक उपकरण आहे, ज्याद्वारे खेळणी तयार केली जातात. ज्यामध्ये मुख्यतः मुलांच्या बौद्धिक तसेच शारिरिक विकासाचा विचार करून खेळणी तयार केली आहेत. स्टार्टअपची खेळणी वाहन कौशल्य विकास, संयुक्त गतिशीलता, एकाग्रता वाढवते, हात-डोळा समन्वय वाढविणे आणि मुलांना अनुभवात्मक शिक्षण देतात. लहानपणी मुलांना आलेले अनुभव मेंदूला आकार देतात आणि मुलाची शिकण्याची, इतरांशी जुळवून घेण्याची आणि दैनंदिन ताणतणावांना आणि आव्हानांना प्रतिसाद देण्याची क्षमता ही खेळणी मजबूत करतात.

कशी सुचली कल्पना :
मुलांसाठी प्रारंभिक बालपण विकास हा एक त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. प्रारंभिक बालपणात मूल शारीरिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या वाढते आणि विकसित होत असते. बालपणाचा विकासावर प्रियांका गेली काही वर्ष काम करीत होत्या. या अभ्यासादरम्यान असे लक्षात आले की, मुलासाठी जी खेळणी आहेत ती त्याच्या बालपणावर परिणाम करू शकतात. ज्यामध्ये काही बदल करून आपण बाल विकासासाठी खेळणी तयार करू शकतो. कालांतराने त्यांचे संज्ञानात्मक कौशल्ये कशी विकसित होतात, असे प्रियांका यांनी सांगितले.

उपकरणाची वैशिष्ट्ये :
- मुलाचा स्क्रीनटाइम कमी करणे
- बौधिक चालना, एकाग्रता तसेच विकासास मदत करते
- सर्वांगीण वाढीसाठी लाकडी इकोफ्रेंडली खेळणी
- शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित करते
- देशातील हस्तकला जपल्या जाताय

पारंपारिकता जपत रोजगार उपलब्धी :
विविध वस्तू वापरत नानाविध प्रकारची खेळणी बनवणारे अनेक कलाकार देशात आहे. अशा या कलाकारांना या स्टार्टअपच्यामाध्यमातून खेळणी तयार करण्यासाठी नियुक्त केले जाते आहे. यामधून कारागिरांच्या कलेला देखिल वाव मिळतो आणि त्यांना आर्थिक सक्षम होण्यास मदत होत आहे. एवढेच नाही तर देशात असलेल्या वेगवेगळ्या हस्तकला देखील या माध्यमातून जपल्या जात आहेत.
अजय-- आणि प्रियांका ---, संस्थापक, टॉय ट्रंक

Back to Press Releases